धडा 10
1 ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!
2 मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो.
3 कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही.
4 ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात.
5 आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.
6 आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू.
7 तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत.
8 आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही.
9 हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये.
10 कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे.
11 अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.
12 जे कित्येक स्वत:ची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वत:स स्वत:कडून मोजत असता व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत.
13 परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे.
14 आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो.
15 आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ.
16 यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसन्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही.
17 पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.”
18 कारण जो स्वत:ची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो.