प्रेषितांचीं कृत्यें

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28


धडा 2

1 पन्रासावाचादिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते.
2 अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरुन गेले.
3 त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या. आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या.
4 ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता.
5 त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते, हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते.
6 या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला.ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वत:ची भाषा ऐकायला मिळाली,
7 यामुळे यहूदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की, प्रेषित हे कसे करु शकले. ते म्हणाले, “पाहा! ही माणसे (प्रेषित) ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत ती सर्व गालीलीआहेत!
8 पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वत:च्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण भिन्र देशाचे आहोत:
9 पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया
10 फ्रुगिया, पंफिलीया, इजिप्त, कुरेने शहराजवळचा लिबीयाचा भाग, रोमचे प्रवासी,
11 क्लेत व अरब प्रदेश असे आपण सर्व निरनिराळ्या देशांचे आहोत. आपल्यापैकी काही जन्मानेच यहूदी आहेत. काही जण धर्मांतरीत आहेत. आपण या निरनिराळ्या देशांचे आहोत. परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या भाषेत ऐकत आहोत! आपण सर्व ते देवाविषयीच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो.’
12 ते लोक आश्चर्यचकित झाले, आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, “काय चालले आहे?”
13 दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.
14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठचाने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका.
15 सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हांला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत!
16 परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:
17 ‘देव म्हणतो:शेवटल्या दिवसात मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील तुमच्या तरुणांना दृष्टांतहोतील; तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील.
18 त्यावेळी मी माझा आत्मा माझ्यासेवकांवर, पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन आणि ते भविष्य सांगतील.
19 वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.
20 सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल चंद्र रक्तासारखा लाल होईल नंतर प्रभुचा महान व गौरवी दिवस येईल.
21 प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल. योएल 2:
28 -
32
22 ‘माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे.
23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती.
24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही.
25 येशूविषयी दावीद असे म्हणतो:‘मी प्रभूला नेहमी माइयासमोर पाहिले आहे; मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माइया उजवीकडे असतो
26 म्हणून माझे हृदय आनंदाने आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते. होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील
27 कारण तू माझा जीव मरणाच्या जागेतराहू देणार नाहीस तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 तू मला कसे जगायचे ते शिकविलेस. तू माइयाजवळ येशील. आणि मला मोठा आनंद देशील.’ स्तोत्र.16:8-
11
29 ‘माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला. आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे.
30 दावीद हा संदेष्टाहोता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील.
31 ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहीत होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो:‘त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही. त्याचा देह कबरेमध्ये कुजला नाही.’दावीद रिव्रस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता.
32 म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले!
33 येशूला स्वर्गात उचतून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात!
34 दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वत: म्हणाला,‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला: मी तुझे वैरी
35 तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंतमाझ्या उजवीकडे बैस. स्तोत्र. 1
10 :1
36 “म्हणून, सर्व यहूदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व रिव्रस्तअसे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य!”
37 जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना फार फार दु:ख झाले. त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले, “आम्ही काय करावे?”
38 पेत्र त्यांना म्हणाला, “तुमची ह्रदये व जीविते बदला आणि येशू रिव्रस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
39 हे अभिवचन तुम्हांसाठी आहे, हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांनासुद्धा आहे. प्रभु आपला देव, ज्यांना स्वत:कडे बोलावितो अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे.”
40 पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दांत त्यांना सावधान केले; त्याने त्यांना विनवणी केली, “ह्या युगाच्या दुष्टाई पासून स्वत:चा बचाव करा!”
41 मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली.
42 सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत. ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवीत. विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत. ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत.
43 प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत; आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला.
44 सर्व विश्वासणारे एकत्र राहत. प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत.
45 विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या. नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले.
46 सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत. त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता. ते त्यांच्या घरामध्ये एकत्र खात. आपले अन्न इतरंना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत.
47 विश्वासणारे देवाची स्तुति करीत. आणि सर्व लोकांना ते आवडत असत. आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभु रोज अनेक लोकांची भर घालीत असे.